लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीचा सांस्कृतीक उपक्रम "लहराओ तिरंगा प्यारा" संपन्न
खामगाव -Janopchar news network: लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती तर्फे आपल्या संस्कृतीला व देशभक्तीला उजाळा देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा मंगळवार दि.6 ऑगष्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर स्मारक मंदीर सभागृह, खामगांव येथे स्वातंत्र दिनाच्या अनुषंगाने बालगटातील, प्राथमिक गटातील व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर भव्य नृत्य समुहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमामाध्ये स्थानिक 35 शाळांचा सहभाग होता. यामध्ये विभिन्न देशभक्तीपर गितांचा व बहारदार कलाकृतीचा संगम सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आला.
स्पर्धेत ग्रुप (अ) बालगट नर्सरी ते युकेजी मधून प्रथम क्रमांक सेंट अॅन्स इंग्लीश मिडीयम हायस्कुल, द्वितीय किडझी स्कुल, तृतिय युगधर्म स्कुल हे विजयी ठरले. ग्रुप (ब) प्राथमिक गट वर्ग 1 ते 4 विद्यार्थ्यां मधून प्रथम युगधर्म पब्लीक स्कुल, द्वितीय राणा लकी सानंदा एज्युकेशन शॉवर, तृतिय संस्कार ज्ञानपीठ विजयी ठरले. ग्रुप (क) माध्यमिक गट वर्ग 5 ते 8 विद्यार्थ्यां मधून प्रथम एसबी ज्ञान मंदीर इग्लीश मिडीयम स्कुल, द्वितीय युगधर्म पब्लीक स्कुल, तृतिय संस्कार ज्ञानपीठ तर ग्रुप (ड) माध्यमिक गट वर्ग 9 ते 10 मधून प्रथम सेंट अॅन्स इंग्लीश मिडीयम हायस्कुल, द्वितीय संस्कार ज्ञानपीठ, तृतिय युगधर्म पब्लीक स्कुल विजयी ठरले.
यावेळी जिल्हा प्रांतपाल पीएमजेएफ लॉ.गिरीष सिसोदीया, डिस्ट्रीक कॅबीनेट सेक्रेटरी लॉ.रितेशजी छोरीया, आमदार मा.धिरज लिंगाडे, आमदार आकाशदादा फुंडकर यांची मातोश्री सुनिताजी फुंडकर, प्रतिष्ठीत व्यवसायीक सतीश राठी, गुंजकर कॉलेजचे प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर, संतोष डिडवाणीया, संजय सोनोने, सर्व पत्रकार बांधव, प्राचार्य, विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक वृंद तसेच लॉयन्स क्लब संस्कृतीचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लॉयन्स क्लब संस्कृतीचे अध्यक्ष लॉ.शैलेश शर्मा, सचिव लॉ.तेजेंद्रसिंह चौहान, कोषाध्यक्ष लॉ.गजानन सावकार, प्रोजेक्ट चेअरपर्सन लॉ.गोविंद चुडीवाले, लॉ.संजय उमरकर, एमजेएफ लॉ.सुरज बी.अग्रवाल, झेडसी उज्वल गोयनका, लॉ.रविंद्रसिंग बग्गा, अनुज चुडीवाले यांच्यासह लॉयन्स क्लब संस्कृतीचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन लॉ.संजय उमरकर तर आभार प्रदर्शन लॉ.तेजेंद्रसिंह चौहान यांनी केले. उपरोक्त माहिती डिस्ट्रीक्ट कॅबीनेट ऑफीस एमजेएफ लॉ.राजकुमार गोयनका पीआरओ यांनी दिली आहे.
Post a Comment