पिंप्री गवळी येथील तलावात आढळले दोन चिमुकल्यांसह  मातेचा मृतदेह 

आर्यन होता आठ वर्षाचा तर प्राची पाच वर्षाची


खामगाव - जनोपचार न्यूज नेटवर्क -तालुक्यातील  पिंप्री गवळी येथील तलावात दोन लहान चीमुल्यासह मातेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे मृतकांची ओळख पटली असून महिलाही तीस वर्षीय तर मुलगा आठ व मुलगी पाच वर्षाची असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे..  हे तिन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. 

      खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथे असलेल्या छोट्या तलावातून  आज दिं २६ ऑगस्ट रोजी शेतात जाणाऱ्या काही नागरिकांना दुर्गंधी येत होती. यामुळे त्यांनी तलावा जवळ जाऊन पाहिले असता त्यांना तलावातील पाण्यावर एका महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. या घटनेची माहिती गावात वाऱ्या सारखी पसरली. यामुळे गावकऱ्यांनी सदर तलावात धाव घेतली. या बाबत माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व नागरिकांच्या मदतीने सदर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले. सदर महिलेने आपली दोन्ही मुल रुमालाने कमरेला बाधून तलावात उडी घेतल्याने प्रथमदर्शनी दिसून येत आहे. घटनेतील मृतक महिला ही अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तिचे नाव पार्वती प्रकाश इंगळे असे आहे तर तिने आर्यन वय वर्ष आठ व प्राची वय वर्ष पाच यांना कमरेला बांधून तलावात ओळी घेतल्याचे बोलले जाते. खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनेबाबत मार्ग दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे .



Post a Comment

Previous Post Next Post