चिंता मिटणार......शुक्रवारी होऊ शकतो खामगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- गेल्या सात दिवसापासून विस्कळीत झालेला खामगाव शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारपासून सुरळीत सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहे. एक ऑगस्ट पासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. गेल्या सात दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना मोठा पाणी प्रश्न निर्माण झाला होता. नगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी सुरज सिंह ठाकुर यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी या दुरुस्तीसाठी अतोनात प्रयत्न केले अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश येताना दिसत असून ,गुरुवारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्णत्वास येईल म्हणजेच शुक्रवारी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्या नंतर रोटेशन प्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहिती नको पाणीपुरवठा विभागाचे सुरज सिंह ठाकुर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post