पत्रकार गणेशोत्सव मंडळाची कार्यकारणी गठीत

समितीच्या अध्यक्षपदी गणेश पानझाडे तर सचिव मुबारक खान

स्वखर्चाने होणार गणेश उत्सव साजरा
सदर उत्सव सहा दिवसांचा साजरा होणार असून पत्रकार भवन येथे गणरायाची स्थापना तसेच उत्सवादरम्यान वृक्षरोपण, पत्रकार बांधवांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प, नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, कवी संमेलन यासह विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उत्सव पत्रकार बांधव स्वखर्चाने साजरा करणार असून पत्रकारांव्यतीरिक्त कुणाकडूनही देणगी स्विकारल्या जाणार नाही. तसा ठरावही बैठकीत घेण्यात आला आहे.





खामगाव - संपुर्ण राज्यात जल्लोषात साजरा केला जाणारा गणेशोत्सव याहीवर्षी पत्रकार गणेश उत्सव समितीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने दि.९ ऑगस्ट रोजी स्थानिक पत्रकार भवन येथे बैठक पार पडली. यावेळी  बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार शरद देशमुख तर अशोक जसवानी, योगेश हजारे, गणेश उत्सव समिती चे माजी अध्यक्ष अनुप गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

              यावेळी सर्वानुमते पत्रकार गणेशोत्सव समिती २०२४ च्या अध्यक्षपदी गणेश पानझाडे, उपाध्यक्ष किरण मोरे, सुनिल गुळवे, सचिव मुबारक खान, कार्याध्यक्ष आनंद गायगोळ, सहसचिव आशिष पवार, कोषाध्यक्ष सुमित पवार, सहकोषाध्यक्ष गणेश भेरडे, संघटक मोहन हिवाळे, सहसंघटक शिवाजी भोसले, प्रसिध्दी प्रमुख सिध्दांत उंबरकार, सल्लागार किशोरआपा भोसले, प्रशांत देशमुख,जगदीश अग्रवाल, शरद देशमुख, योगेश हजारे,  अशोक जसवानी, , राहुल खंडारे, पंकज गमे व कार्यकारणी सदस्य म्हणून शेख सलीम, अमोल गावंडे, मोनु शर्मा, सुधिर टिकार, सैयद अकबर, आकाश पाटील, महेंद्र बनसोड, निखिल देशमुख, कुणाल देशपांडे, मुकेश हेलोडे, सुरज बोराखडे आदींची नियुक्ती करण्यात आली. यानंतर मागिल वर्षीच्या समितीने झालेला खर्चाचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला. या बैठकीला असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते. 


Post a Comment

Previous Post Next Post