पीएसआय ब्राह्मणे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टे आवारात वृक्षारोपण 


मेहकर: जनोपचार न्यूज नेटवर्क - मेहकर पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक ब्राह्मणे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ठाणेदार शिंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. आपल्या कर्तव्य तत्परते सर्व श्रुत असलेले पोलीस उपनिरीक्षक ब्राह्मणे हे नेहमीच सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. गुन्हेगारी जगतात ही त्यांची वचक आहे. वाढदिवशी अनाथ हे खर्च न करता वृक्षारोपण करून पुढील पिढीला सावली मिळावी तसेच वातावरणातही शुद्धता रहावी या हेतूने वृक्षारोपण करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Post a Comment

Previous Post Next Post