हजारो महिलांच्या उपस्थिती"नारी शक्ती सन्मान" सोहळा उत्साहात:लाडक्या बहिणींच्या प्रेमाने आमदार फुंडकर भारावले
![]() |
सौ. राधाबाई भोंगे ठरल्या प्रथम बक्षीस ई - बाईकच्या मानकरी |
खामगाव - जनोपचार न्यूज नेटवर्क:- ई बाईक, टॅब, मोबाईल, स्मार्ट वॉचसह शेकडो बक्षिसे जिंकल्याचा चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद, अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा दिलखुलास संवाद तर आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटू स्नेहा कोकणे पाटीलचे मार्गदर्शन, बालकांनी व ज्येष्ठ महिलांनी सादर केलेले मराठमोळे नृत्य, बहारदार निवेदन, उत्कृष्ट बैठक व्यवस्था आणि आमदार फुंडकर यांच्यावर बहिणींच्या नात्याने दर्शविलेल्या प्रेमाने "सन्मान नारी शक्ती" चा भावनिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. मैदानावर शनिवार २४ ऑगस्ट रोजी सायं ५ संपन्न झालेल्या या सोहळ्यात खामगाव शहरासह ग्रामीण भागातील हजारो महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या दिवशी दुपारपर्यंत मुसळधार पाऊस बरसात असतांनाही भव्य वॉटर प्रूफ मंडपात साडे सात हजार महिलांनी हजेरी लावली. पुणे येथील आर.जे. अक्षय यांच्या टीमने बहारदार संचलनासह उत्कृष्ट सादरीकरण करत महिलां ४ तास खिळवून ठेवले. अनेक प्रक्ररचे मनोरंजनक खेळ खेळवून त्यांना बक्षिस म्हणून लेडीज पर्स दिल्या. ७ वा . दरम्यान सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटू स्नेहा कोकणे पाटील यांचे आगमन झाले. आत्मसुरक्षेबाबत पाटील यांनी महिलांना आवाहन केले तर प्रार्थना बेहेरेनी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य करत महिलांशी संवाद साधला.
आमदार फुंडकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात विनोदी शैलीने महिला भगिनींना हसविले. लाडकी बहीण योजनेच्या जाचक अटी शिथिल करण्यासाठी केलेले प्रयत्न, मतदार संघात ८० हजारांच्या वर अर्जांना समितीचा अध्यक्ष म्हणून मिळवून दिलेली मंजुरात, विरोधकांनी आणलेले अडथळे, पसविलेले गैरसमज याविषयी माहिती दिली.
आमदार फुंडकर पुढे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारचा एक घटक म्ह्णून मी आपल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे. पात्र असलेली एकही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देतो. रक्षा बंधनाच्या पर्वावर आणि आजच्या या सोहळ्यात एवढी प्रचंड प्रमाणात दाखविलेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. तुमचा माझ्यावरील हा विश्वास यापुढेही आमदार म्हणून जबाबदारीने कार्य करण्यासाठी मला ऊर्जा देणारा ठरणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी "नारी शक्ती वंदन" च्या माध्यमातून आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पवार यांनी नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविले आहेत.
सोहळ्याच्या शेवटी लकी ड्रॉ काढण्यात येऊन उपस्थित महिलांना बक्षिसे वाटण्यात आली. त्यात सौ. राधाबाई समाधान भोंगे रा. हिंगणा उमरा ह्या ई-बाईकच्या प्रथम बक्षिसाच्या मानकरी ठरल्या तर. सौ. लता मुकुंद सिमरस्ते रा. खामगाव यांना द्वितीय बक्षीस म्हणून टॅब देण्यात आला. मोबाईलचे तिसरे बक्षिस सौ. दिक्षिता नितीन हेलोडे रा.खामगाव. यांना लागले. १० स्मार्टवॉचची बक्षिसेही महिलांनी जिंकली. याशिवाय १०० लेडीज पर्स मनोरंजक खेळात जिंकण्याऱ्या महिलांना वाटण्यात आल्या. तर उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांना प्रोत्सहनपर भेटवस्तू देण्यात आली. भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्या पदाधिकारी महिलांनी सर्व बहिणींच्या वतीने आमदार आकाश फुंडकर यांचे ह्रदय सत्कार या प्रसंगी केला. तर फक्त महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच कार्यक्रम बघितला असून खूप मजा आली अशा भावना शेकडो महिलांनी व्यक्त केल्या.
Post a Comment