- मंगळवारी भव्य तिरंगा रॅलीत हजारोच्या संख्येने सहभागी व्हा -- आ.अँड. फुंडकर
*खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क::- भाजपाच्या वतीने मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी खामगाव शहरातून भव्य मोटारसायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये हजारोच्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हा असे आवाहन आ अँड आकाश फुंडकर यांनी केले आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही संपूर्ण देशात 77 व्या स्वतंत्र दिनानिमित्त 9 ते 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. केंद्रीय तसेच राज्य सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने हा राष्ट्रीय उपक्रम राबविले जात आहे. खामगांव मतदार संघात सुध्दा हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावा असे आवाहन आ अँड आकाश फुंडकर यांनी केले आहे. 13 ते 15 ऑगस्ट रोजी पर्यंत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज उभारावा असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रत्येक भारतीयाला आपला राष्ट्ध्वज तिरंगा फडकविन्यासाठी प्रोत्साहित करून नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्र अभिमानाची भावना जागृत करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आ अँड आकाश फुंडकर यांनी सांगितले.
Post a Comment