नगरपरिषद शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप;लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त स्तुत्य आयोजन
खामगाव: जनोपचार नटवर्क: भारतीय जनता पक्षाला तळागाळातील लोकांपर्यंत नेणारे आणि उपेक्षित, वंचित समाज घटकांसाठी आयुष्यभर झटणारे लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त आज खामगाव येथे स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चा आणि विद्यार्थी आघाडी यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित या कार्यक्रमात खामगाव शहरातील नगरपरिषद शाळांमधील सर्व माध्यमाच्या गरजू ,गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते 3357गरजू विद्यार्थ्यांना आकर्षक स्कुल बॅग, वही आणि पेन चे वाटप करण्यात आले. यामध्ये वर्ग 1 ते 5 वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 6 मध्ये हा समाजपोयोगी कार्यक्रम आज बुधवारी 21 ऑगस्ट रोजी पार पडला.यावेळी मुन्ना भाऊ पुरवार, संजय शिनगारे, राम मिश्रा सतिष अप्पा दुडे, डॉ, निलेश टापरे,गणेश जाधव, विनोद टिकार, महेंद्र रोहनकार,अमन जुनेजा,, पवन गरड ,अभीलाश मुर्हे ,नगेन्द्र रोहनकर,मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी त्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले होते. कार्यक्रमाचे संचलन देवकते सर यांनी तर आभार प्रदर्शन योगेश हजारे यांनी मानले.
*विद्यार्थ्यांना मदतीतून भाऊसाहेबांनाअभिवादन*
यावेळी बोलताना आमदार एडव्होकेट आकाश फुंडकर म्हणाले की मतदारसंघातील लाडके नेतूत्व लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती निमित्त भाजयुमो आणि भाजप विद्यार्थी आघाडी यांनी अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केला आहे. खामगाव शहरातील नगर परिषदेच्या सर्व शाळातील सर्व माध्यमाच्या गरजू ,गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करून खऱ्या अर्थाने स्वर्गीय भाऊसाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. भाऊसाहेबांनी आपल्या राजकारणात समाजकारणावर सदैव भर दिला.तसेच जाती, धर्म भेद न करता गोर गरीब, गरजू ,उपेक्षित समाज घटकांना मदतीचा हात दिला. त्याचे अनुकरण करून व त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर समोर आपली वाटचाल सुरू आहे. आयोजकांनी गरिबांना मदतीचा हात देऊन एक कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केला आहे.अनेक गरजू विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चांगली बॅग देखील नसते.त्यामुळे ते थैली, कॅरी बॅगचा वापर करतात. ही बाब लक्षात घेता भाजयुमो व विद्यार्थी आघाडीने त्यांची अडचण दूर केली असल्याचे सांगून आमदार आकाश फुंडकर यांनी आयोजकांचे कौतुक केले.
Post a Comment