नांदुरा पंचक्रोशातील सर्व महिला, मुली, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, शिक्षिका आणि सर्व महिला भगिनींना आवाहन

पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या विरोधात सायलेंट कॅन्डल मार्च आयोजित केला आहे. महिला मुख्यमंत्री असलेल्या राज्यातही महिलांची सुरक्षा धोक्यात आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांच्या विरोधात एकत्र येऊन आपला विरोध दर्शवूया.

आपल्या एकतेची ताकद:आपण सर्व क्षेत्रातल्या महिलांनी एकत्र येऊन आपल्या आवाजाने हा संदेश दिला पाहिजे की आम्ही महिलां आता आमच्या बहिणीवर अन्याय अत्याचार सहन करून घेणार  नाही, आणि आम्ही आपल्यातील प्रत्येक बहिणीसाठी उभे राहू.

दिनांक: १६-०८-२०२४  वेळ: सायंकाळी ७:००  

जमा होण्याचे स्थान नांदुरा रेल्वे स्टेशन परिसर,

मार्चचा समापन:छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर

 सर्व मिळून त्या डॉक्टर बहिणीला न्याय मिळवून देऊया - सौ. सारीका राजेश डागा, नांदुरा



Post a Comment

Previous Post Next Post