अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास व 7000 रु. दंडाची शिक्षा
बुलढाणा जनोपचार न्यूज नेटवर्क :- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला फुस लावून पडविले व तिच्यावर अत्याचार केला. मात्र न्यायालयाने आरोपीला सक्त मजरीची शिक्षा सुनावणी मुलीला न्याय दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार 04 मार्च 2019 रोजी पोलीस स्टेशन देउळगांव राजा येथे आरोपी मनोज उत्तम डोंगरे वय 23 वर्ष रा.उंबरखेड ता. देउळगाव राजा याने पीडीता हीचा पाठलाग करुन फुस लाउन पळवून नेले या प्रकरणात फिर्यादीवरून पोलीस स्टेशन देउळगांव राजा येथे आरोपी विरुध्द प्रथम अपराध क्र.57/2019 कलम 363,354(ड)) भा.दं.वि. सह कलम 12, बा.लै.अ.अधि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये भारतीय दंड संहिता कलम 376 (अ), 366 तसेच बा.लै.अ.अधि कलम 4,8 प्रमाणे वाढ करण्यात आली होती. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि उमेश भोसले व सपोनि प्रमोद भातनाते यांनी पुर्ण करुन आरोपी विरुध्द विद्यमान विशेष जिल्हा सत्र न्यायालय बुलडाणा येथे दोषारोप पत्र दाखल केले. विद्यमान विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने एकुण 10 साक्षीदार तपासले. आरोपी विरुध्द कलम 363,366,354 (ड), 376 (अ) भा.दं.वि. सह कलम 4,8,12, बा.लै.अ.अधि. प्रमाणे सबळ पुरावा उपलब्द झाल्याने न्यायाधीश श्री. आर, एन मेहरे , जिल्हा विशेष सत्र न्यायालय बुलडाणा यांनी आरोपीला 20 वर्षे सश्रम कारावास व 7000 रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता व्हि. एल भटकर साहेब यांनी तर सेशन कोर्ट पैरवी म्हणुन पोहेकॉ सुनिल साळवे ब.नं.1319 यांनी पो.नि. संतोष महल्ले ठाणेदार पोस्टे देउळगांव राजा यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहीले.
Post a Comment