अनुसूचित जाती/नवबौध्द घटकांतर्गत लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजना : २लाख ५०,हजार अनुदान
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- नगर परिषद हद्दीतील अनुसुचित जाती, नवबौध्द घटकातील लोकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, रमाई आवास योजना बाबत आपणाकडे असलेले खालील प्रमाणे कागदपत्रे असतील तर अधिक माहितीसाठी,तत्काळ नगर परिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व नगररचना विभाग यांचे कडे संपर्क साधावा. असे नगर परिषदेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
लागणारी कागदपत्रे व अटी
1) स्वतःची जागा असल्यास 7/12 किंवा नमूना ड 2) जातीचे प्रमाणपत्र 3) उत्पनाचा दाखला4) आधार/रेशन कार्ड किंवा जर तुम्ही अतिक्रमित जागेत राहत असल्यास 1995 पूर्वीचा पुरावा, जसे 1) मतदान कार्ड, 2) इलेक्ट्रिक बील, 3) टॅक्स पावती, 4) असेसमेंट नक्कल, 5) रेशन कार्ड,
*वरील सर्व 1995 पूर्वीचे असावे*
Post a Comment