चिंचोली जवळील दुर्दैवी अपघातात खामगावच्या तरुणाचा मृत्यू

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:  खामगाव - शेगाव रोडवर असलेल्या चिंचोली फाट्यावर चारचाकी व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात खामगाव येथील युवक  जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना २ जुलै रोजी घडली.

खामगाववरून शेगावकडे वैभव सदाशिव शिंदे २४ रा. चिंतामणी नगर सुटाळपुरा खामगाव हा एकटा आपल्या पल्सर दुचाकी क्रमांक एमएच २८ एफ ८७७२ ने जात असताना शेगाव कडून खामगाव कडे जाणाऱ्या एम. एच. २७ डी. ई. ७५४२ याALCAZAR या वाहनाचा अपघात झाला व यामध्ये वैभव गंभीर जखमी झाला. नंतर त्याला उपचारार्थ सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असतांना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेची मुळे हळहळ व्यक्त होत असून जनोपचार न्यूज नेटवर्क परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

Previous Post Next Post