दि खामगाव अर्बन बँक कर्मचारी संघ द्वारा प्रबंध संचालक व सेवानिवृत्त कर्मचारी यांना निरोप
खामगाव. जनोपचार न्यूज नेटवर्क :- दिनांक २९ जुनं रोजी सायंकाळी सात वाजता सेवानिवृत्त मा. प्रबंध संचालक साहेब सुधीरजी कुळकर्णी साहेब व कर्मचारी यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मुख्यकार्यालयात घेण्यात आला . या कार्यक्रमा चे अध्यक्ष आपले बँकेचे अध्यक्ष मा प्रा विजयराव पुंडे तर प्रमुख उपस्थिती ,उपाध्यक्ष मा ङां श्री सतीशजी कुळकर्णी साहेब, जेष्ठ संचालिका सौ फुलवंती ताई कोरडे मा संचालिका मनीषा माटे मा. संचालक श्री संदीपजी डोळस मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री व्यंकटेशजी कुळकर्णी संघटनेचे अध्यक्ष मा श्री परागभाऊ देशमुख व कार्याध्यक्ष अजयजी सराफ कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते
दीप प्रज्वलन व भारतमाता पूजन करून झाली
प्रथम या महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचारी वर्गाचा सपत्नीक सत्कार करण्यात आला व आपल्या बँकेचे मा.प्रबंध संचालक साहेब यांचा सुद्धा सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी श्री बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझी बँकेत २९ वर्ष झाली असुन मला मा अधिकारी व कर्मचारी यांच्या कडुन बरेचसे शिकायला मिळाले व सर्व सहकारीनी भरभरून प्रेम दिले. असे मनोगत केले
तसेच सत्कार मूर्ती मां.प्रबंध संचालक साहेब यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या बँकेचे अध्यक्ष संचालक मंडळ . व संघटनेचे पदाधिकारी. व बंकेचे सर्व अधिकार व कर्मचारी. यांनी सहकार्य केले मी केलेल्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिल्याबद्दल बँकेचे प्रगती आलेख हा चढताच राहीला. व पुढील यशस्वीतेसाठी व शुभेच्छा दिल्या तसेच मी वेळोवेळी मार्गदर्शन करेल असे सांगितले व सर्वांचे मनापासून आभार मानले केले.
संघटनेच्या अध्यक्ष यांनी सुद्धा साहेबांचा मार्गदर्शनाखाली बँकेने चांगली प्रगती केली व सोबतच कर्मचारी वर्गाचे जे पगार पत्रक तयार करून ऐतिहासिक पगार वाढ दिली या बद्दल साहेब व संचालक मंडळ यांचे आभार मानले
समारोपाच्या भाषणात बँकेचे अध्यक्ष साहेब यांनी मा प्रबंध स़चालक साहेब यांनी बंकेचे बदलत असलेल्या र रिझर्व्ह बंकेचे नवनविन धोरण नुसार नियमांचे तंतोतंत पालन करूण सर्व परामिटर मध्ये बंकेचे प्रगतीच आलेख हा उंचावत नेला तसेच संचालक मंडळ . व सभासद ग्राहक व कर्मचारी यांच्या समन्वयाने तसेच कर्मचारी संघटना यांचा व संचालक मंडळ यांचा समन्वय साधून जी बँकेची प्रगती केली या बद्दल विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे सचिव श्री प्रमोद कस्तुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसचिव श्री वासुदेव गोंड यांनी केले कार्यक्रमाची सांगता सहभोजनाने झाली .या कार्यक्रमाकरीता मुख्य कार्यालयात तील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी तसेच ईतर शाखेचे अधिकारी कर्मचारी सर्व उपस्थित होते . संघटनेचे वतीने सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचें सत्कार घेण्यात येतो या निमित्याने कर्मचारी एकत्र येऊन आपसातील आत्मभाव नक्कीच वाढतो व संस्थेच्या प्रगतीचा टप्पा पार करता येतो त्यामुळे अश्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावे ही विनंतीसंघटन मे शक्ती है.
Post a Comment