नॅशनल हायस्कूलच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी दानशूर माजी विद्यार्थ्यांचा स्वयंप्रेरणेने पुढाकार  ! ! !

 


खामगाव जनोपचार नेटवर्क :- या स्थानिक श्री. अरजण  खिमजी र्नॅशनल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खामगाव या शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी व  शाळेविषयीच्या आत्मियतेने सन 1982 च्या इयत्ता 10 वीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून 17200 रुपये किमतीचे चांगल्या दर्जाचे 200 पेजेसचे 800 लेटर बुक्स  शाळेला भेट देण्यात आले.
या माजी विद्यार्थ्यांमधे प्रामुख्याने मानीय डाॅ. श्री. अशोक बावस्कर साहेब, प्राचार्य  सी. एम. जाधव सर, श्री राजेशजी झांबड, श्री. भिकू संघराराजाजी, श्री. शेवाळे सर, श्री. वीरेंद्र शहा सर यांनी पुढाकार घेतला. तसेच शाळेच्या एक  माजी विद्यार्थीनी सी. ए. सौ. श्रुती साकेत गोयनका यांचेकडून . राजकुमार गोयनका यांचे शुभ हस्ते 13115 रुपये किमतीचे 200 पेजेसचे 600 लेटर बुक्स शाळेला भेट देण्यात आले.
शाळेच्या प्राचार्या सौ. नंदा ऊदापूरकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत  भविष्यातही अशाच ठोस मदतीची व मार्गदर्शनाची सूद्धा अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष दिनेश संघवी व शिक्षकवृंद या प्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post