खामगाव येथे जयहिंद लोकचवळीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क :-येथे जयहिंद लोकचवळीच्या वतीने दहवा आंतरराष्ट्रीय योग दिन खामगाव येथे योग प्रात्यक्षिके करून साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खामगाव येथील सावजी ले आऊट आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे उदघाट्न जयहिंद लोकचवळीचे बुलडाणा जिल्हा समन्वयक स्वप्नील ठाकरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी योग प्रशिक्षक मीनलताई ठाकरे यांनी योगाचे महत्व विषद करून सुदृष्ठ निरोगी आयुष्यासाठी नियमित योग करा. नियमित योग केल्यास आपला आरोग्य सुदृढ आणि सशक्त राहण्यास मदत होईल. याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी योगाचे वेगवेगळे प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
Post a Comment