नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यात महाराष्ट्रात एनडीए ला जे अपयश मिळाले त्याची पूर्ण जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्रजी फडवणीस यांनी स्वीकारली मला ही गोष्ट आवडली की फडवणीस यांनी अपयशाची जबाबदारी ही स्वीकारली कारण यश मिळाले की त्याचं श्रेय घेण्यासाठी जो तो पुढे असतो पण मिळालेलं अपयश हे ही हे मोठ्या मनानं स्वीकारणे स्वतः जबाबदारी घेणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे त्यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा दिला आहे कारण त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की पुढे होणाऱ्या विधानसभेसाठी व त्यात पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळवून देण्यासाठी मला या पदातून मुक्त करावे मी आता संघटनात्मक काम करेल आणि निश्चितपणे जर देवेंद्र फडवणीस चा राजीनामा वरिष्ठांनी स्वीकारला तर मात्र येणाऱ्या विधानसभे साठी देवेंद्र फडणवीस ही सर्वात मोठी डोकेदुखी विरोधकांना ठरणार आहे कारण देवेंद्र फडवणीस हे संघटनात्मक काम करून प्रत्येक विधानसभेची मोर्चे बांधणी मजबुतीने करणार आहे हे तितके खरे कारण आपण चुकलो आपल्या चुकीच्या मुळेच राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाला अपयश मिळाले आहे हे त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार केले आहे पण ज्या चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त करून लोकसभेच्या अपयशाला कशी मात देता येईल व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर यश कसे संपादन करता येईल याचा विचार त्यांनी केला आहे व म्हणूनच त्यांनी वरिष्ठांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला असून पुढे संघटनात्मक काम करण्याचा निर्णय असल्याचे त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून मत व्यक्त केले आहे जर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक काम देवेंद्रजी करतील तर विपक्ष यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आता आपल्याला विधानसभेसाठी जी निवडणूक आहे ती सोपी तर नाहीत पण कठीण इतकी भयंकर कठीण राहणार आहे की ज्याच्या तुम्ही अंदाजा सुद्धा लावू शकणार नाही हेही तितकेच खरे आहे असो देवेंद्रजींनी दिलेला राजीनामा वरिष्ठ स्वीकारतील का हे आता महत्त्वाचे आहे पण अपयशाची जबाबदारी देवेंद्रने घेतली आहे
-- संभाजीराव टाले
पत्रकर,खामगाव
(72629 44551)
Post a Comment