बासर येथे ऐतिहासिक सामूहिक सरस्वती पूजन विद्यारंभ सोहळा उत्साहात संपन्न.
दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 16 व 17 जून 2024 रोजी श्री क्षेत्र बासर येथे सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी विद्येची व बुद्धीची देवता असलेल्या सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. श्री क्षेत्र बासर हे पाल्यांच्या अक्षर अभ्यासासाठी म्हणजेच शैक्षणिक आरंभासाठी सुप्रसिद्ध आहे म्हणूनच मूल्यसंस्कार विभागाच्यावतीने पालक व पाल्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये भक्ती व मूल्यसंस्काराची शिकवण रुजवण्याचा विधायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यात आला.
![]() |
जाहिरात |
या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून आलेल्या हजारो मुले,युवा-युवती आणि पालकांनी सामुहिक पद्धतीने सरस्वती मातेचे पूजन केले. गुरुपुत्र नितीन मोरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनातुन सोहळ्यास उपस्थित सेवेकरी पालक-पाल्यांशी प्रबोधनात्मक संवाद साधला तर दिनांक 17.06.2024 रोजी गुरुवर्य परमपूज्य गुरुमाऊली यांनी उपस्थित हजारो सेवेकरी परिवारास सरस्वती मातेच्या सेवेचे महत्व सांगितले याचबरोबर सेवा कार्याच्यावतीने ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियान अंतर्गत सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा उल्लेख केला. दोन दिवसीय आयोजित या सोहळ्यास राज्यातून-परराज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ज्यामध्ये श्री
श्री क्षेत्र बासर श्री सरस्वती देवस्थान संस्थानचे चेअरमन शरद पाठक, श्री. श्री. श्री.बालयोगी रामलूजी महाराज ,नंदीपेठ तेलंगणा राज्य, राज्यसभेचे विद्यमान खासदार तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र बंडू पाटील चव्हाण, नांदेड जिल्ह्याचे युवा उद्योजक सुबोध काकाणी, सौ सपना हरणे, न्यायधीश न्यायालय धर्माबाद, रामराव पवार पाटील, आमदार मुधोळ/भैसा, विश्वनाथ पाटील बिदराळी, कर सभापती, पंचायत समिती, बासर, डी .लक्ष्मण राव सरपंच बासर, तेलंगणा यांची प्रमुख उपस्थिती होती.
Post a Comment