भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी : श्रीमती रक्षाताई खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी 

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नांदुरा शहरात आनंदोत्सव व विजयी जल्लोष साजरा

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दैदिप्यमान यश संपादीत करून भारताचे  पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी  यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात रावेर मतदारसंघातून खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व बुलढाणा मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांचा समावेश करण्यात आला. या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने आज रविवार दि. ०९/०६/२०२४ रोजी नांदुरा शहरामध्ये भाजपा महिला मोर्चाच्या वतीने *विजयी जल्लोष व आनंदोत्सव* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सारिकाताई डागा यांच्यासह सर्व भाजपा महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या व असंख्य महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन केले व विजयाच्या निमित्ताने गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव व विजयी जल्लोष उत्साहात साजरा केला.


यावेळी भाजपा महिला मोर्चा खामगाव जिल्हाध्यक्षा सौ.सारिकाताई राजेश डागा यांच्यासह बेटी बचाओ, बेटी पढाओ संयोजिका सौ. ज्योतीताई तांदळे, सौ. अनिताताई चौधरी, प्रदेश सचिव महिला मोर्चा रुबीना ताई पटेल कल्याणीताई इंगळे, पुष्पाताई चंदनगोळे, किरणताई वेरूळकार, रत्नाताई नालट, शांताताई बोदडे, कावेरीताई मोरखेडे, पुष्पाताई पैसोडे, रेखाताई भोपळे, त्रिगुणाताई लांडे, उषाताई सराग, पार्वतीताई बोदडे, वच्छलाताई भालतडक, निर्मलाताई सपकाळ, शोभाताई हिंगणकार, विमलाताई होनाळे, विमलताई बोरनारे, गौरी आडोकार, जयाताई वावगे, रेखाताई तायडे, सुमेदाताई गवळी, ज्योतीताई सातव, पुष्पाताई भोपळे* यांच्यासह सर्व भाजपा महिला पदाधिकारी, नेत्या, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्या व असंख्य नरेंद्रजी मोदी समर्थक महिला उपस्थित होत्या



__

Post a Comment

Previous Post Next Post