मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ना. जाधव यांचे खामगावात आगमन...
प्रमुख तीन मागण्या पूर्ण करण्याची अपेक्षा -ज्येष्ठ संपादक जगदीश अग्रवाल
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- सलग चौथ्यांदा निवडून आलेले बुलढाणा लोकसभेतील खासदार प्रतापराव जाधव यांची राज्य मंत्री मंडळात निवड झाल्यानंतर आज ते खामगाव येथे दाखल याच दरम्यान खामगाव शहराच्या मुख्य तीन समस्या ते मार्गी लावतील काय अशी अपेक्षा ज्येष्ठ संपादक जगदीश अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, खामगाव च्या जनतेने माननीय प्रतापरावांना चार वेळेस लोकसभेकरिता निवडून दिले आहे . खामगावकरांच्या मुख्य तीन मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत .नंबर एक खामगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या नंबर 2 ,खामगाव जिल्हा व्हावा व नंबर 3 ,खामगाव शहर हे रेल्वेच्या मुख्य मार्गावर यावे ,या तीन मागण्यांकरिता स्थानिक आमदार श्री आकाश दादांना पूर्ण सहकार्य करून या तीनही समस्या मार्गी लावाव्या अशी अपेक्षाही त्यांनी खामगावकर जनतेच्यावतीने व्यक्त केलीआहे.
Post a Comment