पोलिसांचा सुप्रीम वर छापा..

३ महिलांसह ११तरुण ताब्यात

खामगाव शेगाव रोडवरील हॉटेल सुप्रीममध्ये चालू असलेल्या अनैतिक देहव्यापारावर छापा टाकून पोलिसांनी तीन महिलांसह अकरा जणांना ताब्यात घेतल्याची घटना काल ९ जून रोजी उघडकीस आली आहे.

जाहिरात

शेगाव - खामगाव रोडवर असलेल्या हॉटेल सुप्रीम येथे स्त्रियांचा अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती शेगाव शहर पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे ९ जून रोजी दुपारी ४.४५ वाजताच्या दरम्यान पोलिसांनी हॉटेल सुप्रीम येथे छापा टाकला होता. यावेळी तिथे अनैतिक देहव्यापार सुरू असल्याचे आढळुन आले. पोलिसांनी याठिकाणाहून तीन महिलांसह ११ जणांना ताब्यात घेतले आहे. 

जाहिरात

यामध्ये श्रीकृष्ण  शेंडगे (२६) रा. शेलोडी, रोहित उर्फ महादेव टेकाळे (२५) रा. शेगाव, निलेश टकले (२९) रा. शेलोडी, दीपक  खेळकर (२२) रा. निमकर्दा ता. बाळापूर जिल्हा - अकोला, योगेश ठाकरे (२२) रा. निमकर्दा ता. बाळापूर जिल्हा- अकोला, प्रवीण  दोलतडे (२६) रा. शेलोडी, शरद प्रभुदास शेंडे (३५) रा. निमकर्दा ता. बाळापूर जि - अकोला, विनोद खेडकर (३२) रा. निमकर्दा ता. बाळापूर जिल्हा अकोला यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चार दुचाकी (किंमत अंदाजे दोन लाख पाच हजार रुपये) नगदी बारा हजार तीनशे रुपये, दहा मोबाईल किंमत अंदाजे ९४ हजार रुपये, इतर साहित्य २२० रुपये. असा एकूण तीन लाख ११ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास ठाणेदार हेमंत ठाकरे करीत आहे.

जाहिरात


Post a Comment

Previous Post Next Post