लेवापाटीदार समाज भ्रातृमंडळ ची आमसभा संपन्न : नवीन कार्यकारणी  गठीत

 खामगाव :- जनोपचार न्यूज नेटवर्क:-  लेवापाटीदार समाज भ्रातृमंडळ खामगांव ची आमसभा  23 जून रोजी अनिल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली गुंजकर क्लासेस येथे पार पडली 

यावेळी डॉ. अरविंद कोलते, अण्णासाहेब पाटील, दिलीप नाफडे, डी के देशमुख, अनिल खर्चे, श्रीमती उषाताई फिरके आदींची प्रमुख उपस्थिती होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला वंदन करून सभेला सुरुवात करण्यात आली. या सभेत नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली असून

अध्यक्ष :-  अनिल श्रीधर चौधरी उपाध्यक्ष :- अनंत ओंकार चोपडे सचिव :- डॉ. श्री प्रवीण मनोहर वराडे सहसचिव :- संजय देविदास कोलते कोषध्यक्ष :- चंद्रकांत कमलाकर नारखेडे सदस्य :- पुंजाजी काशिनाथ नारखेडे, विशवनाथ वामन कोल्हे ,अश्विन ,सुहास वाघूळदे , सुनील विजय चौधरी, प्रशांत तुकाराम खर्चे  विनायक भानुदास भारंबे यांची निवड करण्यात आली. आम सभेदरम्यान कु. अदिती सचिन राणे हिला इयत्ता 10 मध्ये 98.80% गुण संपादित केल्यामुळे व गणित विषयात 100पैकी 100 गुण प्राप्त झाल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 

कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ प्रवीण मनोहर वराडे ह्यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव  संजय देविदास कोलते ह्यांनी केले,हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न व्हावा म्हणून संस्थेच्या सल्लागार मंडळामधील  डी. टी. बोंडे,  विजय नारखेडे सर (शेगांव ), राहुल डहाके, श्री शेखर पंडितराव चोपडे सर ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post