सरस्वती विद्या मंदिराची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क)-स्थानिक मातोश्री जयाबेन जीवनलाल मेहता सरस्वती विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत सलग १२ व्या वर्षीही शाळेचा निकाल १०० % लागला आहे. इंग्रजी माध्यमाची वर्ग १० ची कु. वैदेही सुनिल ढगवाले ही ९६.४०% गुण मिळवुन शाळेतुन प्रथम तर, कु. गौरी दिलीपराव निमगांवकर ९६.२०% गुण मिळवुन द्वितीय व तसेच चि. कुणाल घनश्याम तिजारे ९४.४०% गुण मिळवुन तृतीय आले आहेत. तसेच २० विद्यार्थी ९०% च्या वर गुण मिळवून कौतुकास पात्र ठरले आहेत. ५१ विद्यार्थी डिस्टींग्शन ग्रेडमध्ये आहे. तसेच मराठी माध्यमाची कु. प्रणाली विनोद चौधरी ९१.६०% गुण मिळवुन शाळेतून प्रथम आली, कु. अपेक्षा प्रल्हाद सातव ९१.२०% गुण मिळवुन द्वितिय तर कु. जान्हवी गजानन वानखडे हिने ८५.६०% गुण मिळवून तृतीय आली. ३१ विद्यार्थी डिस्टींग्शन ग्रेडमध्ये येवून कौतुकास पात्र ठरले आहेत. शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे खामगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजयराव देशपांडे, उपाध्यक्ष प्रभाकरराव बुराडे, सचिव महादेवराव भोजने, प्रधानाचार्या सौ. सुषमाताई संदीप टिकले, उपप्रधानाचार्या सौ. दिपालीताई धारव, सौ. सविताताई देशमुख, सौ. मेघाताई गोटी व , संदीप मुरकर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होतेजाहिरात
Post a Comment