निवृत्ती वेतन धारकांनी फोन कॉल्स, संदेशापासून सावधानता बाळगावी : जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, जनोपचार न्यूज नेटवर्क : बुलडाणा जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधिनस्त सर्व निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स आणि संदेशापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.



            जिल्हा कोषागार कार्यालयाकडून निवृत्तीवेतन, सुधारीत निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर सर्व लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुली किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रक्कमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधाला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो. याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात असून याबाबतच्या कोषागार कार्यालयास तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

जाहिरात फक्त 99 रुपयात संपर्क करा 820 881 94 38

निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स आणि संदेशापासून सावधानता बाळगावी. अशाप्रकारच्या फसव्या ऑनलाईन, गुगल पे, फोन पे, किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे भरण्याबाबत दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरुन आलेल्या कॉल्स किंवा संदेशाला प्रतिसाद देवू नये. याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्ती वेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहणार आहे. कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ऋषीकेश वाघमारे आणि अपर कोषागार अधिकारी बबनराव इटे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post