इयत्ता बारावीत सिध्दम जैनला ९६ टक्के गुण


खामगाव (का.प्र.)- येथील नॅशनल हायस्कुलचा विद्यार्थी सिध्दम निलेश जैन या विद्यार्थ्याने इयत्ता बरावी वाणिज्य या शाखेतून ९६.५ टक्के गुण मिळविले आहेत. त्याच्या या यशाचे नॅशनल हायस्कूलच्या शिक्षकांनी व संचालक मंडळाने कौतुक केले आहे. तो केशवन नगर स्थित निलेश जैन यांचा मुलगा असून त्याच्या वडीलांचे घाटपुरी नाक्यावर अरिहंत मेडीकल अँड जनरल स्टोअर्स आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद व आई-वडीलांना दिले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post