बारावीच्या परीक्षेत नारायणी आकोटकर जे वी मेहता विद्यालयातून प्रथम
खामगाव :- इयत्ता बारावीच्या परीक्षेत कुमारी नारायणी जयेश अकोटकर हिने घवघवीत यश संपादन केले आहे. येथील मेहता विद्यालय व कनिष्ठ विद्यालयातून तिने प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. तिला 85 टक्के गुण मिळवले असून नारायणी ही येथील आर्किटेक्चर इन ग्राफिक डिझायनर श्री जयेश अकोटकर यांची सुकन्या आहे. ती आपल्या यशाचे श्रेय गुरुजन व पालकांना देते.
Post a Comment