ये क्या हो रहा है....!
खामगावातील नागरिकांचा पोलिसांना खडा सावाल!
![]() |
घटनास्थळी दाखल झालेली पोलीस |
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा जणू प्रश्न निर्माण झाला आहे कारण एकामागे एक घडलेल्या घटनांचा आलेख पाहतात शहरातील नागरिकांनी "ये क्या हो रहा है..." असा सवालच पोलिस यंत्रणे समोर भा केलाय.
![]() |
जाहिरात |
आज रात्री ८:३० च्या सुमारास येथील भाजप कार्यालय मागील नगर परीषद दवाखाना परिसरातील स्वच्छतागृहात रुपेश महाले नामक युवक लघुशंकेसाठी आला. दरम्यान अनोळखी ने या युवकास कटर मारून व डोक्यात विट मारून जखमी करत खिशातील 3 हजार रूपय हिसकावून पोबारा केला. पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. यापूर्वी देखील एकाच रात्री सात ठिकाणी चोऱ्या मोबाईलच्या चोरीच्या घटना घडल्या असून बस स्थानका जवळील खुनच्या घटनेची शाही अजून वाळत नाही तोच आज ही घटना समोर आली आहे.
Post a Comment