स्वामी विवेकानंद नवयुवक दल तथा मां.भारती प्रतिष्ठाण च्या शौर्य प्रशिक्षण वर्गाचा नेत्रदिपक समारोपीय समारंभ संपन्न


    खामगाव  स्थानिक श्री सदगुरू श्रीधर महाराज संस्थान(श्री चोपडे यांचा मळा) येथे मागील 16 मे पासुन सुरु असलेल्या स्वामी विवेकानंद नवयुवक दल तथा मां.भारती प्रतिष्ठाण द्वारा आयोजित भव्य शिवकालीन मर्दानी युद्धकला व खेळ प्रशिक्षण शिबिराचा शानदार समारोप समारंभ काल सायंकाळी संपन्न झाला. 

    यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर महाराज संस्थान चे विश्वस्त श्री गोकुळ महाराज चोपडे,प्रमुख वक्ते  हभप श्री कैलास महाराज धर्माळी,श्रीधर महाराज संस्थान चे अध्यक्ष श्री अंबादास महाराज चोपडे, स्वामी विवेकानंद मंडळाचे अध्यक्ष ॲड.संजयकुमार बडगुजर, मा.नगरसेवक राकेश भाऊ राणा, आनंद भाऊ सेवक, वस्ताद विजयजी सोनोने पेंटर, मा. भारती प्रतिष्ठाण चे संयोजक सचिन चांदूरकर यांची प्रमुख उपस्थित होती. 


प्रमुख ऊद्बोधनामधे श्री धर्माळी महाराज यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना धैर्य हे सर्वात मोठे शस्त्र असुन त्यामुळेच मनगट मजबुत होवुन आपण हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असे प्रतीपादन केले

      अध्यक्षीय भाषणात श्री गोकुळ महाराज चोपडे यांनी श्रीधर महाराज संस्थान सदैव अशा उपक्रमांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपते असे सांगितले. 

     प्रास्ताविक मधे सचिन चांदूरकर यांनी स्वामी विवेकानंद मंडळ तसेच मां.भारती प्रतिष्ठाण च्या स्थापनेचे उद्देश सांगुन समाजाने आम्हाला अशीच साथ दिली तर आम्ही अजुनही विविध धार्मिक आणी सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपु आणी हि नविन पिढी सुसंस्कारित व बलशाली करून त्यांना एक जबाबदार व्यक्ती बनविण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. 

   ॲड.बडगुजर यांनी संबोधित करतांना आपण संत आणी महापुरुषांच्या भुमीत जन्म घेतला आहे त्यामुळे समाजाप्रती आपली जबाबदारी जास्त आहे असे सांगून सर्वांनी समाज व धर्म कार्यात सहभाग घ्यावा असे सांगितले. 

     यावेळी मागिल दहा दिवसांत प्रशिक्षणार्थीं जे शिकले त्या शस्त्रांची प्रात्यक्षिके त्यांनी करुन दाखविली व ऊपस्थीतांची मने जिंकली यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच प्रशिक्षणार्थीं व त्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त करतांना श्रीधर महाराज संस्थान, स्वामी विवेकानंद नवयुवक दल तथा मां भारती प्रतिष्ठाण चे कौतुक करून आभार मानले तसेच भविष्यात आम्ही आपल्यासोबत राहु असा विश्वास दर्शविला.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यवस्थापन समितीचे चेतन गोडाळे यांनी केले. यावेळी मान्यवरांकडुन प्रशिक्षक वृंदाचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थीं, पालक वर्ग मां.भारती प्रतिष्ठाण च्या महिला भगिनी तसेच गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Post a Comment

Previous Post Next Post