अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आचल झाली यशस्वी
तुम्हाला जीवनात हवं ते साध्य करण्यापासून थांबवणारी गोष्ट फक्त आणि फक्त एकच आहे. यशस्वी होण्याची तीव्र इच्छा!टोकाची तीव्र इच्छा असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करून तुम्ही यशस्वी व्हालच! आणि अशीच शैक्षणिक यशाची गाथा एका छोट्याशा गावच्या गरीब घरातील विद्यार्थ्यांनीने रचण्यात सुरुवात केली. अत्यंत गरीब घरच्या आचाल ने दिवासन रात्र अभ्यास करून पटकावले 95% गुण.
खामगाव तालुक्यातील कदमापूर या छोट्याश्या गावातील जिल्हा परिषद शाळा पळशी ची विद्यार्थिनी परिस्थिती ने अत्यंत गरीब घरची मुलगी आचाल विनोद इंगळे. आचल च्या आईने हातमोजेरी करून तिला शिकवण्याचा विडा उचलला आणि तिने देखील आईचा विश्वास आला तडा न जाऊ देता मन लावून अभ्यास केला .या विद्यार्थिनीने अथक प्रयत्नाने सर्व परिस्तिथी वर मात देत गणित या विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले. व 10 वी मध्ये 95% टक्के मिळविलेया यशाचे श्रेय आचाल ने तिच्या आईला दिले आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल नवथळे सरांनी तिला घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.
Post a Comment