खामगाव येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन कायद्याची माहिती मिळण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न


 खामगाव मध्ये प्रशिक्षणात 650 व बुलढाणा  मध्ये 650 असे 1300 अधिकारी व  कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले


 खामगाव :-  दिनांक 18 मे 2024 रोजी खामगाव शेगाव रोडवरील ब्रह्मांडनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात खामगाव विभाग ,  मलकापूर विभाग व बुलढाणा विभागातील 650 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस  अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. तसेच बुलढाणा येथे सुद्धा 650 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले तसेच 103 पोलीस अधिकारी ज्यात पीएसआय,  ए पी आय,  पी आय , डी वाय एस पी व दोन्ही अपर पोलीस अधीक्षक यांच्या समावेश होता खामगाव येथील प्रशिक्षणात महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकचे कायदे प्रशिक्षक  ॲड संजय पाटील यांनी प्रोजेक्टर च्या माध्यमातून नविन कायद्या  बद्दल बारकाईने सखोल माहिती दिली



या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमा मध्ये खामगाव चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी मार्गदर्शन करताना  आपल्या प्रस्ताविक भाषणात सांगितले की आपल्या भारत देशांमध्ये पोलीस संदर्भामध्ये पोलीस खात्यात अस्तित्वात असणारे भारतीय दंड संहिता , फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय पुरावा कायदा हे तीनही कायदे 1 जुलै 2024 पासून रद्द होऊन नव्याने केंद्र शासने लागू केलेले भारतीय न्याय संहिता , भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्षा अधिनियम हे तीन नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून संपूर्ण हिंदुस्तान मध्ये लागू होत आहे या कायद्यामध्ये जे काही बदल केले आहे व  जनतेला त्याचा खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या अनुषंगाने ते आत्मसात केला पाहिजे म्हणून पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्मचाऱ्यांना  तीनही नवीन कायद्याची परिपूर्ण माहिती देण्यात आली



 व 1 जुलै 2024 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात सुध्दा 1जुलै 2024 पासूनच अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती सुध्दा देण्यात आली

 या  वेळी खामगाव विभागातील खामगाव शहर पोलीस स्टेशन , शिवाजी नगर पोलिस स्टेशन, खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशन, हिवरखेड पोलिस स्टेशन, पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन, जलंब पोलिस स्टेशन, शेगाव शहर पोलिस स्टेशन, शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशन, मलकापूर विभागातील मलकापूर शहर पोलिस स्टेशन , मलकापूर ग्रामीण पोलिस  स्टेशन , दसरखेड पोलीस स्टेशन, नांदुरा पोलीस स्टेशन, जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ,  पोलीस अधिकारी व पोलीस   कर्मचारी उपस्थित  होते या प्रशिक्षणत चहा, पाणी, नाष्टा व भोजनाची उत्तम व्यवस्था होती या प्रशिक्षणात उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डीवायएसपी विनोद ठाकरे यांनी आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post