शिवाजीनगर पोलिसांची यशस्वी कामगिरी
24 तासात पकडला मोटर सायकलचोर
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव शहरात चोरीचा घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलीस आहे आता कंबर कसून तपास करीत आहेत. त्याचा शिवाजीनगर पोलिसांनी 24 तासात मोटरसायकल चोरीचा छडा लावला. घाटपुरी येथील एका समाजाचे मोटरसायकल चोरी झाल्याबाबत शिवाजीनगर पोलिसांना तक्रार मिळाली त्यावरून त्यांनी लगेच तपासणे फिरवून 24 तासात अनोळखी असलेला दुचाकी चोर पकडला.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन शिवाजी नगरचे डिबी पथकातील अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जावून भौतीक व तांत्रीक पध्दतीने सदर गुन्हयांतील दोन अनोळखी इसमांचे नांवे निष्पन्न करुन गुन्हयांतील आरोपीतांना अटक करणेकामी पो.स्टे. सायबर बुलढाणा यांचेकडुन तांत्रीक पध्दतीची अंमलबजावणी करुन सदर गुन्हयांतील आरोपी नामे स्वप्नील विलास निंबाळकर वय 23 वर्ष रा. घाटपुरी ता. खामगांव यास ग्राम मच्छिद्रखेड ता. शेगांव जि. बुलढाणा येथून कायदेशीररित्या ताब्यात घेतले. गुन्हयांतील दुसरा आरोपी नामे अजय शालीग्राम अडणे रा. तेल्हारा जि. अकोला ह.मु. घाटपुरी ता. खामगांव हा पोलीसांना पाहुन ग्राम घाटपुरी येथुन फरार झाला आहे . ताब्यात घेण्यात आलेला आरोपी नामे स्वप्नील विलास निंबाळकर यास सदर गुन्हयांत दिनांक 26/05/2024 वा अटक करुन गुन्हयांसंबधाने सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा अजय अडणे याचेसोबत केलेला असुन गुन्हयांतील चोरी गेलेली मोसा ही MIDC खामगांव येथे ठेवल्याची कबुली दिल्याने सदरची मोसा पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. अटक आरोपी स्वप्नील निंबाळकर याचा PCR घेवून त्यास पुन्हा सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्यानी ग्राम वडनेर भोलजी शिवारातुन एक मोसा चोरी केल्याची कबुली दिली आहे. फरार आरोपी नामे अजय अडणे याचा शोध घेणे सुरु असुन मिळुन आल्यास आजुन चोरी झालेल्या मोसा व घरफोड्या डिटेक्ट होण्याची शक्यता आहे. सदर गुन्हयांचा तपास डिबी. पथक पो.स्टे. शिवाजी नगर, खामगांव हे करीत आहे.ही कार्यवाही पोलीस अधिक्षक सुनील कडासने , अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात खामगांव, उपविभागिय पोलीस अधिकारी. विनोद ठाकरे , खामगांव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद खांबलकर, पोहेकॉ संदिप टाकसाळ, निलसींग चव्हाण, संतोष वाघ, नापोकों राजु कोल्हे, चालक नापोकाँ नितीन भालेराव, पोकॉ प्रविण गायकवाड मपोकों पल्लवी बोर्ड, पोकों केशव झाल्टे, देवीदास चव्हाण यांनी केली आहे
Post a Comment