युवा हिंदू प्रतिष्ठाण ची गाव तेथे शाखा :निमीत्त पिंप्री गवळी शाखेचे उदघाटन


खामगाव- युवा हिंदू प्रतिष्ठाण तर्फे धर्म-जनजागृती साठी करण्यात येत असलेल्या कार्याचाच एकभाग म्हणून  तालुक्यातील पिंप्री गवळी शाखेचे उद्घाटन 18 मे शनिवार रोजी उत्साहात करण्यात आले.


 याबाबत असे की युवा हिंदू प्रतिष्ठाण तर्फे  जात,पात, पंथ,जातीभेद विसरून हिंदुधर्माच्या एकत्रिकरणासाठी कार्य केल्या जात आहे. करीत असलेल्या धर्म एकत्रिकरणाच्या प्रामाणिक कार्यास जनमानसातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे युवा हिंदू प्रतिष्ठाण तर्फे हिन्दू नूतनवर्षारंभा पासून म्हणजे गुडीपाडव्या पासून 'गाव तेथे शाखा 'नुसार  तालुक्यातील पिंप्री गवळी येथे दिनांक 18 मे रोजी सायंकाळी युवा हिंदू प्रतिष्ठाण च्या शाखाचे उदघाटन मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी युवा हिंदू प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष रोहित पगारिया यांच्या आदेशाने पिंप्री गवळी शाखा अध्यक्ष अमोल चंदेल,उपाध्यक्ष शुभम गासे, सचिव तेजस भोम्बळे, सह-सचिव महेंद्र इटीवाले, सदस्य उमेश गोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धर्मबांधव उपस्तीत होते. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली.




Post a Comment

Previous Post Next Post