श्री परशराम महाराज सेवाधारी परिवार तर्फे भव्य दिव्य श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथाचे सामूहिक पारायन श्री अंबादेवी संस्थान अमरावती येथे शनिवार ०१ जुन रोजी आयोजन
श्री परमहंस परशराम महाराज यांचा महिमा ग्रंथाचा सामुदायिक पारायण सोहळा शनिवार, 1 जून 2024 रोजी. विदर्भ कुलस्वामिनी श्री मां अंबादेवी संस्थानच्या अंबागेट जवळ किर्तन सभागृहात आयोजित सकाळी 8 वाजता सामूहिक पारायण सोहळा होणार आहे. सर्व सेवाधारी व भक्तगण तसेच गुरव समाज बंधु भगिनींनी सकाळी 8 वाजता वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अशी संधी लाभणे ऐतिहासिक आहे.
![]() |
जयंत सुरेशराव वानखडे (9763729131) यांना संपर्क करण्याचे आवाहन सेवाधारी परिवार जलकुंड पिंपळोद यांनी केले आहे. |
श्री परशराम महाराज सेवाधारी परिवार तर्फे भव्य दिव्य ना भूतो न भविष्यति सदर पारायण सोहळा आयोजन केले जात आहे. नियोजनानुसार सकाळी 8 ते 8.30 वाजताच्या दरम्यान महाराजांच्या ग्रंथाची दिंडी काढण्यात येईल.
पारायण सोहळा ठीक 8.30 वाजता सुरू होईल. दुपारी 12.00 वाजता विराम घेण्यात येईल. पारायण विरामा नंतर पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. पारायण पूर्ण होताच आरती झाल्याबरोबर सर्व पारायणकर्ता व सेवाधारी यांच्याकरिता महाप्रसादाचे देखील आयोजन केले आहे. बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तांकरिता आदल्या दिवशी शुक्रवार 31 मे 2024 रोजी
मुक्कामाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.
श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचे परायण सोहळ्यामध्ये खालील वस्तू सोबत आणणे आवश्यक आहे.
1) महिमा ग्रंथ
२) दोन आसन
३) पुरुषांकरिता पांढरा शर्ट पांढरा पैजामा व स्त्रियांकरिता पिवळी साडी किंवा लाल साडी परिधान करावी
४) ज्यांना नित्य क्रमाने औषध घ्यायचे असतात त्या औषधी सोबत आणाव्या. ज्या पारायण कर्त्याकडे श्री परमहंस परशराम महाराजांचा महिमा ग्रंथ उपलब्ध नसेल त्यांना अंबादेवी संस्थान मधील कीर्तन हॉल येथे तो खरेदी करता येईल व त्याचे स्वागत शुल्क १५०/- रुपये असेल
सदर कार्यक्रमाकरिता सर्वांनी आवश्यक वेळेवर उपस्थिती दर्शवावी ही विनंती देखील आयोजकांनी केली आहे. अधिक माहिती साठी मुख्य सेवाधारी व सेवाधारी परिवाराचे
जयंत सुरेशराव वानखडे
9763729131 यांना संपर्क करण्याचे आवाहन सेवाधारी परिवार जलकुंड पिंपळोद यांनी केले आहे.
श्री परशराम महाराज बद्दल संक्षिप्त माहिती
सुमारे 124 वर्षापुर्वी 14 मे 1900 रोजी जैतापुर ता. भातकुली जि. अमरावती या खेडेगावात शिवशंकर परमात्म्याने परशराम नावाने नररूपात भीमाबाई बळीरामपंत (गुरव) वडनेरकर वडिलांचे नाव श्री बळीरामपंत (गुरव) वडनेरकर जळतापुर जिल्हा अमरावती येथे जन्म घेतला. सुमारे 51 वर्षे कित्येक लिला/साक्षात्कार/महिमा करून भक्तांचे कल्याण केले. परशराम महिमा ग्रंथात याचे विस्तृत वर्णन आले आहे.
Post a Comment