सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलच्या यशस्वी वाटचालीची ८ वर्षे
खामगाव (नितेश मानकर)बुलडाणा जिल्ह्याची ओळख एक आर्थिक, शैक्षणिक व वैद्यकीय दृष्ट्या मागासलेला जिल्हा अशीच होती. कुठल्याही प्रकारच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने जिल्ह्यातील रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी नजिकच्या मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत असे. यामध्ये बरेचदा रस्त्यातच रुग्ण अत्यवस्थ होऊन दगावल्या जात असे. ही बाब लक्षात घेऊन खामगांव येथील ११ नामांकित वैद्यकीय तज्ञांनी एकत्र येऊन आपल्या खामगांव शहरात जागतिक स्तरावरील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व उपचार जनतेस कशाप्रकारे उपलब्ध करुन दिल्या जातील यासाठी मंथन केले. यामध्ये खामगांव व परिसरातील विविध वैद्यकीय शाखांमधील २१ तज्ञांची साथ त्यांना लाभली व अशाप्रकारे त्यातूनच सिल्व्हसिटी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, क्रिटीकल केअर व ट्रॉमा सेंटरची मुहुर्तमेढ रोवल्या गेली. दि. ८ एप्रिल २०१६ रोजी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर स्थानिक गोकुल नगर, जलंब रोड, खामगांव येथे हॉस्पिटलचे विधिवत लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.
अत्यंत जटील व किचकट हृदयरोग / हार्ट अटॅक, उच्च व कमी रक्तदाब असलेले रुग्णांचे उपचारासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असा अतिदक्षता विभाग (आयसीयु), किडणीचे आजाराने ग्रासलेले रुग्ण उपचारासाठी डायलीसीस युनिट, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया व लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर, एनआयसीयु व बालरोग विभाग, अपघात ग्रस्त रुग्णांसाठी अस्थिरोग विभाग, नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा, फिजीओथेरपी, सर्व प्रकारच्या रक्त व लघवी तपासणीसाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज पॅथॉलॉजी विभाग, ब्लड स्टोरेज युनिट, हृदयरोगींसाठी २डी इको व स्ट्रेस टेस्ट तपासणी, सर्व प्रकारचे एक्स-रे व सोनोग्राफी तपासणी सुविधा, जागतिक स्तरावरील नामांकित सिमेन्स कंपनीची १.५ टेस्ला एमआरआय मशीन व कमी वेळेत अचुक निदान करण्यासाठी ९६ स्लाईस सिटी स्कॅन मशीन, २४ तास मेडीकल स्टोअर्सची सुविधा सोबतच २४ तास निरंतर अत्यावश्यक सेवा व एमडी डॉक्टर्स ची उपलब्धता, प्रशिक्षित नींग स्टाफ, आरोग्यदायी वातावरण, स्वच्छता व मनमिळावू कर्मचारी वृंद यामुळे काही दिवसातच सिल्व्हसिटी हॉस्पिटल रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसाठी पहिल्या पसंतीचे उपचार केंद्र म्हणून नावारुपास आले.
मल्टीसिस्टीम ऑर्गन फेल्युअर, गुडघ्याची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया, किचकट प्रसुतीशस्त्रक्रिया, मेंदूविकार उपचार व मेंदु शस्त्रक्रिया, पोटाच्या जटील शस्त्रक्रिया, किडणी शस्त्रक्रिया, अत्यंत गंभीर हार्ट अटॅक, पॅरालेसीस, जळीत रुग्ण, बिकट विषबाधा, सर्पदंश, पाण्यात बुडून गंभीर झालेले इ. प्रकारचे कित्येक रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन त्यांचा जीव वाचू शकला. अशा प्रकारचे रुग्ण खामगांव मध्ये उपचार घेऊन ठिक होणे हे केवळ अशक्य होते. जागतिक स्तरावरील अत्याधुनिक उपकरणे व उत्कृष्ठ उपचार अत्यंत माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध करुन दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या रुग्णउपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सिल्व्हरसिटी व्यवस्थापनाच्या माध्यमातून निरंतर प्रयत्न केल्या जात आहेत.यावर्षी ८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्याने विविध रुग्ण सेवी उपक्रम घेण्याचा मानस सिल्व्हरसिटी हॉस्पिटलने केला आहे. यामध्ये दि. ८ एप्रिल ते ३० एप्रिल २०२४ पर्यंत विविध हेल्थ चेकअप पॅकेजेस सवलतीचे दरात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. दैनंदिन व्यस्ततेमुळे आपण आपल्या आरोग्याची नीट काळजी घेत नाही. त्यातच व्यायामाचा अभाव, ताणतणाव, व्यसनाधीनता व असंतुलीत आहार यामुळे शरीरातील सर्व तंत्र बिघडते व मग नकळत गंभीर आजार सुरू होतात. अशा परिस्थितीत आकस्मित व अघटीत घडण्याआधीच आपल्या स्वास्थाबद्दल केवळ एका दिवसातच इत्यंभूत माहिती करुन घेण्यासाठी बेसिक हेल्थ चेकअप पॅकेज, कॉम्प्रीहेन्सीव हेल्थ चेकअप पॅकेज, एक्झीक्युटीव हेल्थ चेकअप पॅकेज उपलब्ध आहेत. तसेच या हेल्थ पॅकेजमध्ये विविध वैद्यकीय तज्ञांचा सल्लाही मोफत मिळणार आहे.
तरी बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिल्व्हरसिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अशोक बावस्कर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पंकज मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पराग महाजन व सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव लड्का व संचालक मंडळाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
Post a Comment