हुंड्यासाठी छळ केल्या प्रकरणातील आरोपी पती व सासू सासर्याची निर्दोष मुक्तता
ऍडव्होकेट गावंडे व ऍडव्होकेट सांगळे यांनी केला युक्तिवाद
खामगाव:- हुंड्यासाठी केलेला छळ असाह्य झाल्याने विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्या प्रकरणातील आरोपी पती सासू-सासर्याची येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात एडवोकेट श्रीराम गावंडे व ॲडव्होकेट नितीन सांगळे यांनी युक्तिवाद केला.
प्राप्त माहितीनुसार पिंपळगाव काळे येथील सौ रूपाली नितेश राऊत हिने १०-०७-२०२० रोजी राहत्या घरात गळफास लवून आत्महत्या केली दरम्यान तिच्या आईने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती यावरून पोलिसांनी आरोपी पती नितेश राऊत, सासरे शंकर राऊत व सासू इंदिराबाई राऊत यांच्या विरुद्ध कलम ४९८अ, ३०४ब,५०४,५०६ भादविनुसार गुन्हा नोंदवून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सदर प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश २ श्री पी पी कुलकर्णी यांनी सात साक्षीदार तपासले. यामध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध न झाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता केले. अशी माहिती एडवोकेट गावंडे यांनी जनोपचार ला दिली.
Post a Comment