मतदान करणे हे आपले अधिकार व काळाची गरज-कचरूलालजी जोशी 

आयसीयुमध्ये असताना सुद्धा बजावला मतदानाचा हक्क

खामगाव- मतदानाचा हक्क बजाविणे हा केवळ आपला अधिकार नसून राष्ट्रीय कर्तव्य सुध्दा आहे. या कर्तव्य भावनेतून येथील सराफा भागातील रहिवासी कचरूलाल रामनिवास जोशी वय 80 यांनी मतदानाचा हक्क बजावला. सामाजिक कार्यकर्ते रवि जोशी यांचे वडील कचरूलाल जोशी हे मागील दहा दिवसापासून खाजगी दवाखान्यात आय सी यु मध्ये उपचार घेत आहेत,असे असतानाही त्यांना मतदानाची ओढ लागली होती. 

त्यामुळे त्यांनी शारीरिक व्याधीने त्रस्त असूनही ऑक्सीजन ॲम्बुलन्सव्दारे दवाखाना ते मतदान केंद्रापर्यंत प्रवास करून तेथे पोहचून परिवारासह मतदानाचा हक्क बजावून मतदान करणे हे आपले अधिकार व काळाची गरज आहे असा समाजा समोर एक आदर्श निर्माण केला।



Post a Comment

Previous Post Next Post