विनापरवाना रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त : अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकाची कारवाई
जळगाव जामोद ( प्रतिनिधी) जिल्हाभरात अवैध गौण खनिज वाहतुक जोमात सुरू आहे. रात्रीच्या सुमारास नदीपात्रातून रेतीचा रेतीचा उपसा करून रेतीमाफीयाकडून रेतीची विनापरवाना विक्री सुरू आहे. रेतीची विनापरवाना वाहतूक सुरू असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकास मिळाली असता एएसपी पथकास मडाखेड शिवारात रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टर आढळून आले. ट्रॅक्टर त्याब्यात घेवून रेतीसह 5 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. सदर कारवाई 29 एप्रिल रोजी करण्यात आली या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
![]() |
......जाहिरात...... |
बुलढाणा जिल्ह्यात रेतीमाफियांचा सुळसुळाट आहे. विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे महसूल विभागाचे नुकसान होत आहे. तरी सुद्धा महसूल विभाग रेतीमाफियावर होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे. जिल्हात जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शाखाली एएसपी पथकाने 28 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास जळगाव जामोद परिसरात गस्तीवर असताना पोलीस पथकास मडाखेड शिवारातएक लाल रंगाचे ट्रॅक्टर ट्रालीसह मडाखेड गावाकडे येतांना दिसल्याने पोलिसांनी त्या ट्रक्टरला थांबविले. आणि पाहणी केली असता ट्रक्टरचे ट्राली मध्ये अवैध्यरित्या विना परवाना गौण खनिज रेती 1 ब्रास मिळुन आली. यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विठ्ठल रमेश थेरोकार वय 24 व रा. माऊली पोष्ट भेंडवळ ता. जळगांव जामोद जि बुलडाणा असे सांगितले. तसेच ट्रक्टर चालकाकडे गौण खनिज रेतीची रॉयल्टी नसल्याने त्याचे ताब्यातील लाल रंगाचे SWARAJ 744 XT कंपनीचे ट्रक्टर विना नंबरचे व ट्राली सुध्दा लाल रंगाची त्या ट्राली मध्ये अंदाजे 01 ब्रास रेती किंमती अंदाजे 1 हजार रुपयेची भरलेली मिळून आली. ट्रक्टर चालक याचे कडे रेतीची रॉयल्टी व ड्रायव्हीग लासयन्स तसेच ट्रॅक्टर व ट्रालीचे कागदपत्र नसल्याने ट्रक्टर कि. 5 लाख रुपये, ट्राली किंमती अंदाजे 50 हजार रुपये व ट्रॉलीतील अंदाजे 01 ब्रास रेती किंमती अंदाजे 4 हजार रुपये . असा एकुण 5 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोहेकॉ सुधाकर थोरात यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चालक विठ्ठल थेरोकार याच्या विरुद्ध कलम 379 भा.द.वि. सहक. 158/177 3(1)/181 5/180, 50/177 मो.वा. का. प्रमाणे पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सुनील कडासाने यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली
पोहेकॉ सुधाकर थोरात, पोकॉ शिवशंकर वायाळ व पोका. हिरा परसुवाले यांनी केली.
Post a Comment