आधी करु मतदान मगच दुसरे काम!
रांगा विरहीत मतदान व्हावे याकरीता टोकन-उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांची माहिती
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- बुलढाणा लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक दिनांक २६ एप्रिल २०२४ शुक्रवार मतदानाचा दिवस आहे. सध्या लग्नसराई व उष्णतेची लाट आहे, याही परिस्थीती मध्ये लोकशाही मध्ये मतदानाचा हक्क बजावणे आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. मतदान केंद्रावर रांगा विरहीत मतदान व्हावे याकरीता टोकन सुध्दा देण्यात येणार आहे. टोकनची व्यवस्था त्या त्या मतदान केंद्रावर करण्यात आली आहे. टोकन मिळाल्यानंतर मतदाराला रांगेत उभे राहता बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० आहे. त्यामुळे अगदी सकाळी ७.०० वाजता उन्हाच्या आधी उपस्थित राहून आपली सर्व कामे मागे ठेवून मतदान केंद्रावर मतदानासाठी यावे आणि या राष्ट्रीय उत्सवात आपला सहभाग नोंदवावा असे २६ खामगांव विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे.
Post a Comment