विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल - पालकांचे विचारमंथन

खामगाव, जनोपचार न्यूज नेटवर्क  - आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलसोबत नवीन शैक्षणिक धोरणाविषयी विचारमंथन केले. ७ एप्रिल रोजी येथील तुळजाई हॉटेलच्या सभागृहात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.२१ व्या शतकामध्ये शैक्षणिक क्षेत्रात असलेली जागतिक आव्हाने पेलण्याची शक्ती आपल्या पाल्यांमध्ये निर्माण कशी होईल, यावर शिक्षक आणि पालक यांच्यात नवीन मार्ग शोधण्याबाबत चर्चा झाली. आपल्या पाल्यांच्या भवितव्याविषयी पालकांचे ध्येय निश्चित करून हमखास यश कसे मिळवता येईल, यावर चर्चा झाली. याबाबत पालकांशी हितगुज साधताना पोद्दार एज्युकेशन नेटवर्कचे जनरल मॅनेजर विशाल शाह म्हणाले की, पालकांना पोद्दार इंटरनॅशनल स्कूलविषयी संपूर्ण माहिती असली पाहिजे, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमची संस्था केवळ शिक्षण नव्हे तर विद्यार्थ्यांच्या जीवनाची जडणघडण विचारमंथन कार्यक्रमाला उपस्थित पालक करण्यासाठी वर्गखोलीच्या बाहेर जाऊन त्या मुलांना मानवी मूल्याचे शिक्षण देऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास करून संस्कारीत नागरिक घडविते, हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्याध्यापक अनिल चाढी यांनी, आमची संस्था मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना भविष्यातील देशाचे चांगले व जबाबदार नागरिक घडवते. ते पुढे म्हणाले की, ही संस्था पोद्दार एज्युकेशन नेटवर्कशी जोडलेली असून, या संस्थेची स्थापना १९२७ मध्ये झाली आहे. अशी माहिती त्यांनी दिली. 



राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आंनदीलाल पोद्दार संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. ९६ वर्षांपासुन ही संस्था शिक्षण क्षेत्रात सेवा देत आहे. संस्थेच्या १४४ व इतर भागीदारीमध्ये १०० पेक्षा जास्त शाळांचे जाळे पसरले आहे. या संस्थेची विद्यार्थी संख्या २ लाख ३० हजार असून, ८ हजार कर्मचारी आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.


खामगावमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची शाखा सुरू झाली असून, पालकांनी त्यांच्या पाल्यांना या शाळेत प्रवेश द्यावा, असे आवाहन त्यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post