ज्येष्ठ संपादक जगदीश अग्रवाल यांच्या वाढदिवसा निमित्त अग्रवाल हॉस्पिटल येथे 2 मे रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर : खामगाव प्रेस क्लब चा उपक्रम

खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क):- खामगाव प्रेस क्लबचे सल्लागार, ज्येष्ठ संपादक, समाजसेवक श्री. जगदीशजी अग्रवाल यांच्या वाढदिवसा निमित्त दि. 2 मे गुरुवार रोजी अग्रवाल हॉस्पिटल, जलंब रोड, गोकुळ नगर, थेटे हॉस्पिटल जवळ खामगाव येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन खामगाव प्रेस क्लब द्वारे करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन देणार आहेत. शिबिरामध्ये बी.एम.डी. टेस्ट म्हणजे हाडाच्या ठिसूळतेची मशीनद्वारे तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच एक्स-रे आणि गर्भवती मातांची सोनोग्राफी तपासणी शुल्क मध्ये 50% सूट राहील. तरी संबंधित रुग्णांनी अग्रवाल हॉस्पिटलच्या मो. नं. 8605779989, 7218998933 वर नाव नोंदणी करून या सुवर्ण सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष व सर्व पत्रकार पदाधिकारी व सदस्यगण यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post