पंचशील होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे वतीने "जागतीक महिला दिना" निमित्त महिला वाकेथॉन स्पर्धा संपन्न
जनोपचार न्यूज नेटवर्क :- १० मार्च २०२४ रविवार रोजी "जागतीक महिला" दिनानिमित्त वाकेथॉन Empowering Women Through Menstrual Health आयोजीत करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. उर्मिला ठाकरे, सामाजीक कार्यकर्त्या, खामगांव हया तर प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. दादासाहेब कविश्वर अध्यक्ष, पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळ, खामगांव प्रमुख उपस्थीतीमध्ये संस्थेचे सचिव डॉ. सौ. मंगलाताई कविश्वर, सौ. श्रध्दाताई देशपांडे सचिव, शारदा समाज महिला मंडळ, खामगांव, राजेश राजोरे देशोन्नती संपादक, खामगांव हे उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीला उपस्थीत महिलांचे दिलेल्या वयोगटानुसार एकुण २५५ स्पर्धकांची मोफत नोंदणी करण्यात आली. त्यानंतर क्रॉस बिटचे फिटनेस सेन्टरचे निष्ठा पुरवार जेठानी यांचे मागदर्शनाखाली झुंबा (वार्मअप) घेण्यात आले. त्यांनतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख उपस्थीतीत डॉ. दादासाहेब कविश्वर यांचे हस्ते वाकेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी देवून वयोगटानुसार स्पर्धेला सुरवात करण्यात आली. हि वाकेथॉन पंचशील होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयातुन सुरवात होवून जलंब नाका, नांदुरा रोड, गोकुळ नगर मार्गे थेटे हॉस्पीटल, नाना नानी पार्क ते जलंब नाका मार्ग शेवटी पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालय येथे सांगता झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अलिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजिंक्य कविश्वर यांनी विजेते तसेच सहभागी सर्व स्पर्धकांचे हार्दीक अभिनंदन केले, व तसेच महिला सबलीकरणासाठी महाविद्यालयातर्फे मासीकपाळी स्वच्छता जनजागृती सप्ताह १ मार्च ते १० मार्च २०२४ पर्यंत राबविण्यात आले.
त्यामध्ये खामगाव तालुक्यातील विविध महाविद्यालयामध्ये जावून महिला प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले. त्यामध्ये डॉ. अपर्णा बावस्कर, डॉ. सौ. गायत्री सोनी, डॉ. शिल्पा कविश्वर, डॉ. स्मिता लष्करे डॉ. माधुरी वानखडे, डॉ. स्वाती तराळे, डॉ. निलीमा वानखेडे, डॉ. शेख जिनत, डॉ. स्वाती गजघाने, डॉ. दुर्गा दाभाडे, डॉ. सोनल टिबडेवाल हे प्रामुख्याने होते. त्यानंतर प्रमुख उपस्थीती डॉ. दादासाहेब कविश्वर यांनी महिलांचे हक्क व लढासाठी महिलांनी एकजुटीने एक व्हावे असे प्रतिपादन केले. सौ. मंगलाताई कविश्वर यांनी महिलांचे गौरव आणि सन्मानमध्ये कविता सादर केली.
राजेश राजोरे यांनी आपले भाषनातुन महिलांनी जिवनात कसे समोर जावे याबाबत मागदर्शन केले. तर आपले अध्यक्षीय भाषनामध्ये सौ. उर्मीलाताई ठाकरे यांनी महिला सबलीकरण बयल आपले विचार व्यक्त केले. या वाकेथॉन स्पर्धेमध्ये तीन वयोगटामध्ये विजेते स्पर्धेक पुढील प्रमाणे होते. वयोगट (अ.) १२ ते ३० प्रथम प्रिती सोळंके, बितीय निकीता लाड, तृतीय मुनी सस्त्या, वयोगट (ब)- ३१ ते ५० प्रथम वनमाला शेगोकार, व्दितीय शुभांगी काटोले, तृतीय श्वेता बडजाते आणि वयोगट (क) ५० चे पुढील मध्ये प्रथम माधुरी भारंबे, व्दितीय रेखा गावंडे तृतीय वर्षा लोढाया तसेच उत्स्फुर्त प्रतिसाद देते कु, रेवा देशपांडे वय ९ वर्ष आणि रेखा अग्रवाल वय ६४ या स्पर्धकांचा प्रोत्साहनपर गौरव करण्यात येवून उपस्थीत मान्यवरांचे हस्ते त्यांना पारीतोषीक देण्यात आले.
![]() |
जाहिरात |
तसेच महाविद्यालयातील सर्व कार्यरत शिक्षिकांचा मान्यवरांचे हस्ते गुणगौरव करून त्यांना पारीतोषीक देण्यात आले. त्यानंतर महाविद्यलयीन विद्यार्थ्यांनी पोष्टर, तसेच महिला दिनावर नाटीका सादर करण्यात आली हि नाटीकेची रचना तृतीय वर्ष बि.एच.एम.एस विद्यार्थीनी श्रुती वानखेडे व निर्देशन माधव नरवाडे यांनी केले. सहभागी सर्व महिला स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येवून त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. स्मिता लष्करे आणि माधुरी वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. गायत्री सोनी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परीश्रम घेतले.
Post a Comment