महाराष्ट्र शासनाच्या बुलढाणा जिल्हा नियोजन समितीवर राजेंद्र बघे यांची निवड



खामगांव:- आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुलढाणा जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव यांच्या शिफारशी वरून झाली  असून उप सचिव महाराष्ट्र शासन नी.भा. खेडेकर यांनी ही निवड केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे व उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांचे विशेष प्रयत्न आहे.  राजेंद्र बघे  हे खामगांव शिवसेना तालुकाप्रमुख असून त्यांचा तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभर दांडगा संपर्क आहे. तसेच त्यांनी युवा वर्गामध्ये आपली चांगली छाप निर्माण केली आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने बुलढाणा जिल्हा विशेष निमंत्रण सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या नियुक्ती मुळे त्यांचे सर्वत्र जिल्हाभर अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post