विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातुन ठाकुर कुटुंबियांची निर्दोष मुक्तता
खामगाव - शहर पोस्टे येथे श्रीमती डालेश्वरी अरूणसिंग बयस रा. शहापुर (म.प्र.) यांनी फिर्याद दिली होती की, त्यांची मुलगी सौ. शारदा विजयसिंग ठाकुर हिचा सासरची मंडळी पती विजयसिंग प्रकाशसिंग ठाकुर, प्रकाशसिंग गोपालसिंग गौतम (ठाकुर), प्रशांतसिंग नंदुसिंग ठाकुर, सपना प्रशांतसिंग गौतम (ठाकुर), दिपीका उर्फ गुड्डी ईश्वरसिंग ठाकुर व खुशबु विजयसिंग ठाकुर यांनी संगनमत करून मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून शारिरीक व मानसिक छळ करीत होते. तसेच माहेरवरून २ लाख रूपये आणण्याचा तगादा लावत असत. पैसे आणले नाही तर फारकती दे असे म्हणुन छळ करीत होते.
त्यामुळे सौ. शारदा ठाकुर हिने आत्महत्या केली. श्रीमती डालेश्वरी बयस यांच्या फिर्यादीवरून शहर पोस्टेमध्ये उपरोक्त आरोपींविरूध्द अप.क्र.३५६/१७ भादंवि कलम ४९८ (अ), ३०६, ४९४, ४६५, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती पोलिसांनी वि. तदर्थ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश क्र.१ यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र खटला क्र. ८/२०१८ नुसार दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी अभियोक्ता यांनी ७ साक्षीदार तपासले. तर आरोपींच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून वि. न्यायालयाने २६ मार्च २४ रोजी उपरोक्त सहाही आरोपींची निदर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अॅड. तरुणकुमार व्ही. मोहता यांनी काम पाहिले.
Post a Comment