मुख्याध्यापिकेने केला अशोभनीय प्रकार!

विद्यार्थ्यांची पॅन्ट सोडून नको ते केले.. आणि झाला गुन्हा दाखल

शेगाव (प्रतिनिधी)- राग आलेल्या शिक्षिकेने चक्क विद्यार्थ्यांची पॅन्ट काढून नको ते चाळे केल्याची खळबळजनक घटना शेगाव येथून समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी त्या मुख्याध्यापीके विरुद्ध बाल लैंगिका अत्याचारासह विविध गुन्हे दाखल केले

जाहिरात फक्त 99 रुपयात.

 शेगाव प्रतिनिधी:-  केळी वाटप दरम्यान एका विद्यार्थ्यला खराब केळी मिळाली.त्यामुळे त्याने पित्याकडे तक्रार केली. पाल्याल खराब केळी  मिळाल्याबाबत  मुख्याध्यापिकेला पालकांनी जाब विचारहोता.त्यामुळे मनात राग धरून मुख्याध्यापिकेने आठ वर्षीय विद्यार्थ्यांची चिडून पॅन्ट उतरवून अश्लील चाळे केले .या प्रकरणी  पालकाच्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी मुख्याध्यापिके विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

 समजलेल्या माहितीनुसार 21 मार्च रोजी शेगाव तालुक्यातील जवळा बु. येथील एका शाळेमध्ये 15 मार्च रोजी केळीचे वाटप करण्यात आले होते. दरम्यान शाळेतील एका विद्यार्थ्याला खराब केळी मिळाल्याने त्यांनी याबाबत त्यांच्या वडिलांना सांगितले. त्यामुळे वडिलांनी मुख्याध्यापकेला मुलाला खराब केळी का दिली. असा जाब विचारून मुख्याध्यापिकेला चांगलेच धारेवर धरले होते.

Advt.

 तर याबाबतचां राग मुख्याध्यापिकेने मनात ठेवून 21 मार्च रोजी पीडित विद्यार्थ्याला माझ्याबद्दल तक्रार करतो का माझी बदली करायला लावतो का असे म्हणत त्याची पॅन्ट सोडून अश्लील चाळे केले. त्यामुळे घाबरून विद्यार्थी हा घाबरलेल्या अवस्थेत शाळेमधून पळत सुटला. पडता पडता तो शाळेच्या आवारात पडल्याने त्याच्या पायाला मार लागून तो जखमी झाला. घडलेल्या कृत्य बाबत पीडित  विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांना सांगितला. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून  तक्रारीवरून पोलिसांनी  जवळा बुद्रुक च्या त्या मुख्याध्यापिकेविरुद्ध कलम 323 506 भादवी नुसार सहकलम आठ-दहा बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सहकलम 3(1), (आर), 3(2), (व्ही ए) अ.जा. ज. अ. प्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे खामगाव हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post