शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे महिला दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून साजरा केला जाणारा दिवस आहे.  हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो. हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ देखील हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.


शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे प्रत्येक वर्षी महिला सबलीकरण कक्षाद्वारे स्त्रियोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी ८ मार्च रोजी पंचशील होमिओपॅथिक रूग्णालयाच्या सौजन्याने "मासिक पाळी स्वच्छता व जागरूकता" या विषयावर डॉ गायत्री सोनी यांचे कार्यशाळा शिबीर संस्थेतील विश्वेसरैया कक्षात आयोजित करण्यात आले होते  आणि अनेक युवतींनी याचा लाभ घेतला.


तसेच १२ मार्च रोजी विश्वेसरैया कक्षात संस्थेतील विद्यार्थीनीसाठी प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांचे अध्यक्षतेखाली एक आरोग्यदायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व सोबतच  मोफत "आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर" आयोजित करण्यात आले होते. यामध्ये डॉ गायत्री सोनी, डॉ वानखडे, डॉ गजगाने आणि त्यांच्या सहायकांनी अत्यंत मोलाची भूमिका निभावीत संस्थेतील सुमारे ६०० मुलींची तपासणी पार पाडली.याच दिवशी दुपारच्या सत्रात जिल्हा सत्र न्यायालय खामगांव येथील ॲडव्होकेट रजनी बावस्कार यांनी संस्थेतील सर्व विद्यार्थीनीना "स्त्रियांसाठी कायदा व सुव्यवस्था" या विषयावर सखोल मार्गदर्शन दिले. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी महिला सबलीकरण कक्षातर्फे श्रीमती आर.डी.भारसाकळे व श्रीमती एल.जी.सुलतान यांनी संस्थेतील काही विद्यार्थिनी समवेत अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post