निस्वार्थ भावनेने समाज कार्य करणारा सामाजसेवक हरपला

शहर हितासाठी कोणतीही राजकीय महत्वकांक्षा मनामध्ये न ठेवता निस्वार्थ भावनेने समाज कार्य करणाऱ्या युवा नेत्यांच्या अचानक एक्झिट त्यांच्या चाहत्यांना बसला धक्का .

जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

असे म्हणतात की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. अशाची द् घटना शेगाव शहरात  शहरवासीयांनी अनुभवली.. शहरहितासाठी कार्य करणारा एक लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेल्या युवा सामाज सेवकांच्या अचानकपणे निधनाची वार्ता शहरवासीयांसाठी यातनादायी ठरली आहे.

बुधवार 27 मार्च रोजी सर्वांच्या परिचयाचे शेगाव संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शेखर भाऊ नागपाल यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायक आणि त्यांच्या चाहत्यांना चटका देणारे ठरले .शेगाव शहरातील एका महत्त्वपूर्ण निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणारी व्यक्तिमत्व अचानक पणे निघून गेल्याने शेगाव शहरातील व परिसरातील त्यांच्या चाहत्यावर शोककळा पसरलेली दिसत आह.समाजसेवक शेखर नागपाल यांनी शेगाव शहरात नगरपालिके कडून मनमानी पद्धतीने मालमत्ता कराच्या वसुली विरोधात आवाज उठवून शेगाव शहरवासीयांना न्याय मिळवून देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली नगरपालिका प्रशासनाला जुन्या पद्धतीने आणि दराप्रमाणे मालमत्ता कर वसुली करण्यास भाग पाडले याचप्रमाणे शेखर नागपाल यांनी सार्वजनिक नवरात्र उत्सव असो किंवा गणपती उत्सव असो महापुरुषांची जयंती असो यामध्ये हिरीरीने भाग घेऊन युवकांची एक फळी निर्माण केली तसेच समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती.या विभूतींच्या अचानक एक्झिट मुळे शेगाव शहराची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याची प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्या मधून व्यक्त होताना दिसत आहे.ईश्वर मृतात्म्यास शांती प्रदान करो..हीच प्रभू चरणी प्रार्थना… भावपूर्ण श्रद्धांजली..

                 संकलन :- कमलेश शर्मा शेगाव

Post a Comment

Previous Post Next Post