खामगावात कोयता पकडला

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- एका ऑटोत कोयता घेऊन जात असलेल्या इसमास शहर पोलिसांनी रंगीहात पकडून गुन्हा दाखल केला आहे

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार आज रंगपंचमी असल्यामुळे पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली त्याचप्रमाणे चौका चौकात पोलिसांची नेमणूक केली होती याच दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना चांदमारी भागात एका ऑटो मध्ये धारदार लोखंडी कोयता असल्याचे माहितीवरून पोलिसांनी ऑटोची तपासणी व झाडती घेतली यात आरोपी गोविंद गणेश चराटकर याच्या जवळून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला तसेच त्याच्या ताब्यातील ऑटो देखील जप्त करण्यात आला. याप्रकरणी ठाणेदार नाचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप मोठे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.



Post a Comment

Previous Post Next Post