जयहिंद लोक चळवळ आणि श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने
स्व. संजयभाऊ ठाकरे पाटील यांच्या जयंतीनिमित्त ३ ते ६ मार्च २०२४ या कलावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, सकल मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय संजयभाऊ ठाकरे पाटील यांच्या जयंती निमित्त जयहिंद लोकचळवळ आणि श्री छत्रपती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ६ मार्च २०२४ या कलावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वर्गीय संजयभाऊ ठाकरे पाटील यांची जयंती दरवर्षी विविध कार्यक्रमांनी साजरी केल्या जात असते.यावर्षी असेच विधायक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ३ मार्च रोजी श्री उदासीबाबा संस्थान सावजी ले आऊट मध्ये दुपारी १२ ते ३ या वेळेत प्रगट दिनाचे औचित्य साधून श्री गजानन विजय ग्रंथ परायण आणि महाप्रसाद वितरण कार्यक्रम होणार आहे. तर ४ मार्च रोजी श्री महादेव संस्थान किन्ही महादेव येथे पत्रकार बांधवाचा स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात जयहिंद लोकचळवळ बाबत माहिती दिली जाणार आहे. ५ मार्च रोजी महात्मा फुले जिल्हा सामान्य रुग्णलयात जेवण वापट, ६ मार्च रोजी रोजी सकाळी ९.३० वाजता सामान्य रुग्णलयात रुग्णांना फळ वाटप, १० वाजता सामान्य रुग्णलय व रेल्वे स्टेशन परिसरात अनाथ व अनवाणी व्यक्तींना स्लीपर चप्पलचे वाटप, त्यानंतर अकरा वाजता जलंब नाक्यावरील जयहिंद लोक चळवळ आणि श्री छत्रपती प्रतिष्ठान कार्यालयासमोर पानपोईचे उद्घाटन तसेच स्वर्गीय संजयभाऊ ठाकरे पाटील बळीराजा आत्मसन्मान योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत व सामान्य रुग्णालयात गरजूंना अन्न दान असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री छत्रपती प्रतिष्ठान, स्वर्गीय संजय ठाकरे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट खामगाव, जयहिंद लोक चळवळ यांच्या वतीने स्वप्निल संजय ठाकरे पाटील तसेच पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Post a Comment