खामगांव ब्रह्माकुमारीज द्वारा महाशिवरात्री निमित्त भव्य ज्योतिर्लिंग दर्शन झाँकी
5 ते 9 मार्च पर्यंत दररोज सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत होणार दर्शन
खामगांव जनोपचार नेटवर्क :-प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय खामगांव च्या वतीने महाशिवरात्री च्या पावन पर्वावर सत्यम शिवम सुंदरम शिव परमात्म्याची भव्य झाँकी तयार करण्यात येत आहे.5 मार्च ते 9 मार्च या पाचही दिवस दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही झाँकी दर्शनासाठी खामगांव शहरातील रायगड कॉलनी स्थित ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रावर निशुल्क उपलब्ध राहणार आहे. महाशिवरात्री निमित्त आधुनिक थ्री डी इफेक्ट सह तेरा विविध स्वरूपात शिवलिंगाचे दर्शन घेण्याचा आगळावेगळा अनुभव अनुभवता येणार आहे.तसेच राजयोगच्या माध्यमातून दिव्य शांतीची अनुभूती आणि विश्व नवनिर्माण अध्यात्मिक प्रदर्शनी विशेष करून आयोजित केली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 8 मार्चला ज्योतिर्लिंग प्रदर्शनी सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहे. खामगांव शहरासह संपूर्ण तालुक्यातील शिव भक्तांनी या भव्य ज्योतिर्लिंग प्रतिकृतीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी यांनी केले आहे. झाँकी तयार करण्यासाठी केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शकुंतला दीदींच्या मार्गदर्शनाखाली ब्राकुमारी सुषमादीदी, जया दीदी यांच्यासह सर्व ज्ञानार्थी भाऊ बहिणींनी विशेष सहकार्य केले
Post a Comment