देवभूमी हिमाचल मध्ये एकनिष्ठा फाउंडेशनला निःस्वार्थ सेवा पुरस्कार
खामगांव :- कांगडा हिमाचल प्रदेश मध्ये 23 मार्च रोजी शहीद दिवस रक्तदान शिविर, मेडीकल चेकअप कॅम्प राष्ट्रीय समारोहाचे आयोजन हिमालयन सेवियर्स तर्फे नगर परिषद मैदान कांगडा मध्ये केले होते. खामगांव बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र मध्ये गौ - सेवा रक्तसेवा करत असलेली एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशनला निःस्वार्थ सेवा पुरस्कार नी सम्मानित करण्यात आले.
दिनांक 23 मार्च 2024 रोजी हिमालयन सेवियर्स या संस्थेतर्फे शहीद विर जवान भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला हारफूल मालार्पण पूजा करून हात जोडून भावपुर्ण श्रद्धांजली दिली. राष्ट्रीय लेवलवर रक्तदान शिविर आयोजीत करण्यात आले होते. यामध्ये आपल्या भारत देशातील सर्व राज्यातून रक्तदाते मोठ्या संख्येने आले होते या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करणात आले यामध्ये महाराष्ट्र मध्ये नि:शुल्क रक्तसेवा करत असलेली एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशन ला आमंत्रित करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव, सदस्य गोपाल धोटे, सतिष धोटे यांनी देवभूमी हिमाचल प्रदेश मध्ये रक्तदान करून शहीदांना भावपुर्ण श्रद्धांजली दिली.
![]() |
Advt. |
कारगिल युद्ध मधील नायक कारगिल योद्धा दिपचंद नायक, हिमाचल प्रदेश बास्केटबॉल संघ अध्यक्ष मुनीष शर्मा, हिमालयन सेवियर्स संस्थापक हरीश कुमार, सचिव सनी कौल, विक्की रेहान यांच्या उपस्थितीत हिमाचल प्रदेशची शान (हिमालयीन टोपी) सुरजभैय्या यादव, गोपाल धोटे, सतिष धोटे यांना घालून सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांना सम्मानित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये विविध राज्यातून शहरामधुन आलेल्या सर्व सामाजिक संघटनांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
Post a Comment