खामगाव पोलिसांनी लावला बेपत्ता धारक चा शोध: चिखली येथून घेतले ताब्यात

13 फेब्रुवारी रोजी काही न सांगता खामगाव येथून निघून गेलेल्या धारक चाअखेर खामगाव पोलिसांनी चिखली येथून ताब्यात घेतले.

मूळ सुलतानपूर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथील धारक ब्रह्मानंद दौंड हा खामगाव येथे शिक्षणाकरिता आला होता दरम्यान 13 फेब्रुवारी तो बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. धारका चिखली येथे असल्याचे समजल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण नाचणकर यांच्या मार्गदर्शनात खामगाव येथून एएसआय मोहन करूटले पोलीस कॉन्स्टेबल गणेश कोल्हे प्रमोद बावस्कर व चालक गुन्हे यांनी त्याला चिखली येथून आज ताब्यात घेतले.

Advt.


Post a Comment

Previous Post Next Post